वृत्तसंस्था/ ड्युसेलडॉर्फ (जर्मनी)
जर्मनीच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कनिष्ट पुरुष हॉकी संघाने येथे आयोजिलेल्या चौरंगी हॉकी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. मंगळवारी झालेल्या सामन्यात यजमान जर्मनीने भारताचा 6-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या सामन्यात जर्मनीतर्फे फ्लोरेन स्पर्लिंगने 15 व्या मिनिटाला, बेन हेसबॅचने 20 व्या मिनिटाला, माँटेग्लासने 23 व्या मिनिटाला, फॅबिओ सिझने 38 व्या मिनिटाला, निकास बेरेनडिट्सने 41 व्या, आणि पॉल ग्लेंडरने 43 व्या मिनिटाला गोल नोंदवले. भारतातर्फे एकमेव गोल सुदीप चिरमाकोने 22 व्या मिनिटाला नोंदवला.
या स्पर्धेमध्ये भारतीय कनिष्ठ हॉकी पुरुष संघाने आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ करताना इंग्लंडचा 4-0 असा पराभव केला होता. सदर स्पर्धेत जर्मनीने यापूर्वीचे आपले सर्व सामने जिंकले होते.