, आज-उद्या स्पेनशी सामना
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
सध्या जगात पाचव्या क्रमांकावर असलेला भारतीय पुऊष हॉकी संघ भुवनेश्वरमधील प्रतिष्ठित कलिंगा हॉकी स्टेडियमवर त्यांच्या बहुप्रतिक्षित एफआयएच प्रो लीग 2024-25 मधील मोहिमेची सुऊवात करण्यास सज्ज झाला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज 15 आणि उद्या 16 रोजी जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असलेल्या स्पेनविऊद्धच्या दोन सामन्यांसह त्यांच्या मोहिमेची सुऊवात करेल.
त्यानंतर 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या जर्मनीशी लढती होतील. घरच्या मैदानावर खेळणार असल्याने संघाला त्यांची अलीकडील गती राखण्याची उत्तम संधी मिळेल. जर्मनीविऊद्धच्या सामन्यांनंतर भारत 21 व 22 फेब्रुवारी रोजी आयर्लंडविऊद्ध खेळेल आणि त्यानंतर 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडचा सामना करेल. 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे. ऑक्टोबर, 2024 मध्ये जर्मनीविऊद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संघ शेवटचा खेळला होता, जिथे भारताला पहिल्या सामन्यात 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघावर त्यांनी 5-3 अशी मात केली होती. शेवटी जर्मनीने शूटआउटवर मालिका जिंकली असली, तरी त्यातील चांगल्या कामगिरीमुळे भारताच्या प्रो लीगच्या तयारीतील आत्मविश्वास वाढला.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने आपले जेतेपद यशस्वीरीत्या राखताना आपले सर्व सामने जिंकले होते आणि आशियातील सर्वांत मजबूत संघांपैकी एक म्हणून आपले स्थान मजबूत केले होते. हरमनप्रीत सिंगसोबत उपकर्णधार हार्दिक सिंग हा अनुभवी आणि तऊण खेळाडूंनी भरलेल्या संतुलित संघाला सांभाळेल. मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, सुमित, संजय, जुगराज सिंग आणि विवेक सागर प्रसाद हे वरिष्ठ खेळाडू संघाचा कणा असतील, तर अराईजितसिंग हुंदाल, अंगदबीर सिंग आणि अर्शदीप सिंगसारखे उदयोन्मुख खेळाडू संघात नवीन ऊर्जा आणतील.









