वृत्तसंस्था/ रूरकेला
भारतीय पुरुष हॉकी संघाने येथे एफआयएच प्रो लीग सामन्यात नियमित वेळेत आपले बलाढ्या प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला 2-2 असे बरोबरीत रोखल्यानंतर शूटआउटमध्ये 0-3 असा पराभव पत्करावा लागला. या विजयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बोनस गुणही मिळवला.
मोसमातील आपल्या या चौथ्या शूटआऊटमध्ये भारताला एकही गोल करता आला नाही, तर ऑस्ट्रेलियाने तिन्ही फटक्याच्ंाs गोलात रुपांतर केले. ऑस्ट्रेलियाच्या क्रेग टॉमने चौथ्या आणि अंतिम सत्रामध्ये गोल करून सामना शूटआऊटमध्ये नेला. तोप्वर भारत बलाढ्या ऑस्ट्रेलियन संघाला नमविण्याच्या आणि ओडिशा फेरीतील त्यांची अपराजित घोडदौड संपुष्टात आणण्याच्या मार्गावर होता.
कर्णधार हरमनप्रीत सिंग (20 वे मिनिट) आणि अमित रोहिदास (29 वे मिनिट) यांनी भारतासाठी गोल केले, तर गोव्हर्स ब्लॅक आणि टॉम (53 वे मिनिट) यांनी निर्धारित वेळेत ऑस्ट्रेलियन संघासाठी गोल केले. शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम ब्रँड, ओगिल्वी आणि टॉम विकहॅम यांनी गोल केले, मात्र भारतातर्फे आकाशदीप सिंग, सुखजित सिंग आणि ललित कुमार उपाध्याय यांचे प्रयत्न चुकले. प्रो लीगच्या ओडिशा फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतचे पाचही सामने जिंकले आहेत.









