वृत्तसंस्था / विजयवाडा
अमेरिकेत उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील एका युवतीचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. राज्यलक्ष्मी यर्लाग•ा असे तिचे नाव असून ती इंजिनिअर होती. आंध्र प्रदेशात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करुन ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. तेथे तिने एमएसचा शिक्षणक्रम पूर्ण केला होता आणि ती नोकरीच्या शोधात होती, असे तिच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले आहे.
तिच्या मृत्यूपूर्वी 3 दिवस आधी तिची प्रकृती बिघडल्याची माहिती तिने तिच्या आईवडिलांना कळविलाr होती. तिला सर्दी आणि फटिग आल्याचे तिने तिच्या आईकडे स्पष्ट केले होते. तथापि, तिचा मृत्यू याच कारणामुळे झाला आहे काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या आईवडिलांनी केंद्र सरकारकडे तिचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी आणि तिच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी साहाय्य मागितले आहे. ती बालपणापासून अत्यंत बुद्धीमान होती आणि तिने अमेरिकेत करिअर आपल्या मातापित्यांना त्यांच्या शेती व्यवसायात साहाय्य करण्याचा तिचा ध्यास होता, अशी माहिती देण्यात आली.









