वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंडोनेशियात 24 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या मंदिरी 20 वर्षांखालील वयोगटाच्या चॅलेंज फुटबॉल चौरंगी स्पर्धेत भारताचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये सिरीया, जॉर्डन, यजमान इंडोनेशिया व भारत यांचा समावेश आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने बी. थॉमसची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. इंडोनेशियातील स्पर्धेसाठी 23 जणांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला. 8 ते 18 मे दरम्यान होणाऱ्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ आतापासूनच आपल्या पूर्वतयारीला प्रारंभ करीत आहे. इंडोनेशियातील स्पर्धेत भारताचा पहिला सामना सिरीयाबरोबर 24 जानेवारीला, दुसरा सामना जॉर्डनबरोबर 27 जानेवारीला, तिसरा सामना इंडोनेशियाबरोबर 30 जानेवारीला होणार आहे.









