एफएसी आशिया चषक पात्र अंतिम फेरी ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2027 साली सौदी अरेबियात होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्रता अंतिम फेरीसाठी ड्रॉ काढण्यात आला असून भारतीय फुटबॉल संघाचा क गटात समावेश करण्यात आला आहे.
कौलालंपूरच्या एएफसी कार्यालयात मंगळवारी या पात्रता अंतिम फेरीसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये एकूण 24 संघांचा समावेश असून ते 6 गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटामध्ये 4 संघ राहतील. 2027 साली सौदी अरेबियात होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी यापूर्वीच 18 संघांनी आपले स्थान निश्चित केले असून आता या पात्रतेच्या अंतिम फेरीतील सहा गटातील विजेते संघ पात्र ठरतील. सौदी अरेबियात होणाऱ्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या तिकिट विक्रीलाही यापूर्वीच शौकिनांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पात्रतेची अंतिम फेरी सहा दिवस चालणार आहे. हे पात्रतेचे सामने 25 मार्च 2025 आणि 31 मार्च 2026 या दरम्यान खेळविले जातील. भारतीय फुटबॉल क्षेत्राच्या इतिहासामध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहील. पात्रतेच्या अंतिम फेरीतील भारतीय फुटबॉल संघाच्या मोहीमेला 25 मार्च 2025 रोजी बांगलादेशच्या विरुद्धच्या सामन्याने सुरुवात होईल. हा सामना भारतात होईल. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यातील फुटबॉल लढत 2021 च्या सॅफ चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेत झाली होती. भारतीय फुटबॉल संघाचा पात्रतेच्या अंतिम फेरीतील दुसरा सामना हाँगकाँगबरोबर 9 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. फिफाच्या मानांकन यादीत भारत सध्या 127 व्या स्थानावर असून हाँगकाँग 156, सिंगापूर 161 व्या आणि बांगलादेश 185 व्या स्थानावर आहे.
भारताचे पात्रतेच्या अंतिम फेरीतील सामने
25 मार्च भारत-बांगलादेश (मायदेशात सामना)
10 जून भारत-हाँगकाँग (भारताबाहेर सामना)
9 ऑक्टोबर भारत-सिंगापूर (मायदेशात सामना)
14 ऑक्टोबर भारत-सिंगापूर (भारताबाहेर सामना)
18 नोव्हेंबर भारत-बांगलादेश (भारताबाहेर सामना)
31 मार्च 2026 भारत-हाँगकाँग (मायदेशात सामना)
गट अ-ताजिकस्थान, फिलिपीन्स, मालदिव, तिमोर-लिस्टे
गट ब-लेबेनॉन, येमेन, भूतान, ब्रुनेई,
गट क-भारत, हाँगकाँग, सिंगापूर, बांगलादेश
गट ड-थायलंड, तुर्की, चीन तैपेई, लंका
गट ई- सिरीया, अफगाण, मॅनमार, पाक
गट फ- व्हिएतनाम, मलवेशिया, नेपाळ, लाओस









