वृत्तसस्था/ ►मेलबर्न
भारताविरुद्धच्या आगामी व्हाईट-बॉल मालिकेसाठी सर्व आठही ठिकाणांवरील समर्पित भारतीय चाहते क्षेत्रे विकली गेली आहेत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळेल, 19 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याने त्याची सुरुवात होईल. सर्व आठही केंद्रावरील भारतीय फॅनझोनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला आहे, असे इव्हेंट्स आणि ऑपरेशन्स क्रिकेट ऑस्टेलियाचे कार्यकारी महाव्यवस्थापक जोएल मॉरिसन म्हणाले.









