वृत्तसंस्था / नागपूर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला येथे गुरुवार दि. 6 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडू रोहीत शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल व अन्य खेळाडूंचे नागपूरच्या विमानतळावर आगमन झाले. आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ या वनडे मालिकेत खेळणार असून जसप्रित बुमराहच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ: रोहीत शर्मा (कर्णधार), गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दीक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा









