नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकप भारत जिंकू शकला नाही. त्यामुळे बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारताचे माजी खेळाडू अतुल वासन यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठे वक्तव्य केले आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा एक रिमोट कर्णधार होता. सर्व निर्णय संघ व्यवस्थापन निर्णय घेत होते. असे म्हंटले आहे.
हे ही वाचा : आशियाई नेमबाजीत भारताला आणखी 4 सुवर्ण
एका मुलाखतीत बोलताना वासन म्हणाले, टी-२०मधील कर्णधार म्हणून रोहितचे करिअर संपले आहे. साधारणपणे दोन वर्ल्डकपसाठी कर्णधाराची निवड केली जाते. पण मला असे वाटते नाही की भारतीय संघ असं करू शकेल. रोहितची निवड करून काही मिळाले असे वाटत नाही. असं त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुढचा कर्णधार कोण ?
माझ्या दृष्टीने हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत हे दोन पर्याय पुढील कर्णधारासाठी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. भारताच्या पराभवासाठी रोहित शर्माला जबाबदार न ठेवता संघ व्यवस्थापन यासाठी जबाबदार आहे. मैदानावर तो स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न करत होता. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हे ही वाचा : वॉर्नरकडून कसोटी निवृत्तीचे संकेत
दरम्यान, बीसीसीआई रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेणार का ? हार्दिक पंड्या किंवा ऋषभ पंत यांना नवी जबाबदारी मिळणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.