बेळगाव : येथील गोवावेसजवळील खाऊ कट्टय़ासमोरील मंगल ग्राउंडवर सुरू असलेल्या इंडियन क्राफ्ट बाजार प्रदर्शनाला बेळगावकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत असला तरीही आता हे प्रदर्शन कंपनी करारानुसार रविवार दि. 19 मार्चपर्यंत राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आगामी गुढीपाडवा, रमजान व अक्षय तृतीयाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या प्रदर्शनात एकाच छताखाली 100 हून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताच्या विविध भागातील हॅन्डलूम व हॅन्डीक्राफ्ट उत्पादनांची मांडणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लखनवी चिकन सुट, टॉप्स, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी बांगडय़ा, कार्पेट्स, मधुबनी पेंटिंग्स, सतरंजी, बनारसी, चंदेरी सिल्क साडय़ा, काथ्या वर्क साडय़ा, पश्चिम बंगालच्या साडय़ा, बेडकव्हर, दिवान सेट, केरळ व बॉम्बे पॅन्सी ज्वेलरी, राजस्थानी मोजडी, फॅन्सी चप्पल, लेदर बॅग्स, कॉटन बॅग्स, कॉटन शर्ट, टी-शर्ट, पंजाबी सूट व फुलकारी आयटम्स, मंगलगिरी ड्रेस मटेरियल, कॉटनच्या साडय़ा याबरोबरच काश्मिरी सिल्क साडय़ा व सूट, भव्य अशा स्टॉल्सवर शोभेच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या चिनीमातीच्या बरण्या, फ्लॉवर पॉट्स, बोन्साई प्लांट पॉट्स, फिरोजाबाद हँडमेड लॅम्प्स, जोधपूर पेन्टिंग्स, शोभेच्या वस्तू, फुलपात्रे, सर्व प्रकारची क्रॉकरी, नागालँड ड्राय फ्लॉवर्स, मातीची भांडी आदी वस्तूंचा समावेश आहे. प्रदर्शनात अनेक वस्तूंवर भव्य सवलत दिली जात आहे. तसेच क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर खरेदी करणाऱयांना पाच टक्के सवलत दिली जात आहे. प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश असून पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. पुस्तकांचेही प्रदर्शन प्रदर्शनात पुस्तकांचेही भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून अनेक मान्यवर लेखकांची इंग्रजीमधील पुस्तके प्रत्येकी शंभर ते दोनशे रुपये किलो दराने विकली जात आहेत. हे प्रदर्शन आता 4 दिवसच असल्याने नागरिकांनी त्या लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Previous Articleसमाजाला बसवेश्वरांचे विचार आजही चिंतनशील
Next Article बेळगावला आणखी एका अग्निशमन केंद्राची गरज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









