वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इटलीमध्ये झालेल्या 19 व्या विश्व युवा सांघिक ब्रिज चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या 31 वर्षांखालील वयोगटाच्या ब्रिज संघाने कांस्यपदक पटकाविले. तर या स्पर्धेत 16 वर्षांखालील वयोगटात भारताला चौथे स्थान मिळविले.
या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी 16 वर्षांखालील वयोगटामध्ये भारताचे दोन संघ पात्र ठरले होते. त्यानंतर भारताच्या संघाला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर प्ले ऑफ सामन्यात फ्रान्सने पराभूत केले. त्यामुळे या वयोगटात भारतीय संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
31 वर्षांखालील वयोगटात भारतीय ब्रिज संघाने कांस्यपदक पटकाविले. या वयोगटातील स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग दर्शविला होता. भारताच्या 21 वर्षांखालील आणि 26 वर्षांखालील वयोगटातील संघांना आघाडीच्या 8 संघांमध्ये स्थान मिळविता आले नाही.









