केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने अर्जुन स्पोर्ट्स या संघाचा 45 धावांनी तर इंडियन बॉईज संघाने सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब संघाचा 6 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. प्रतीक खराडेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 29.4 षटकात सर्वगडी बाद 173 धावा केल्या. त्यात दीपक राक्षेने 48, समीर नाईकने 29, पार्थ पाटीलने 33 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे पार्थ नायक, ओमकार, भुपेंद्र यांनी प्रत्येकी 2 तर महेश, सिद्धार्थ व सोहम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्स संघाचा डाव 29.4 षटकात 128 धावात आटोपला. त्यात ओम पाटीलने 34 तर सिद्धार्थ यादवने 32 धावा केल्या.
बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी तर्फे प्रतीक खराडेने 10 धावात 5, पार्थ पाटीलने 12 धावात 3 तर समीर व पवन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 6 गडी बाद 219 धावा केल्या. त्यात अमरदीप पाटीलने नाबाद 97, रामकृष्ण सिदलिंगने नाबाद 36, योगेश जाधवने 25 तर भरत गाडेकरने 28 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे फरजान मुल्लाने 2 तर शंकर होसमनी, संदीप कुमार, किरण यलगार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज संघाने 29.2 षटकात 4 गडी बाद 220 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात वऊणने नाबाद 78, अरिफ बाळेकुंद्रीने 38, शंकर होसमनीने नाबाद 43, सर्फराज मुरगोडने 25 तर किरणने 18 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे भरत गाडेकरने 2 तर अमरदीप पाटीलने 1 गडी बाद केला.









