वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चीनमधील हेंगझोयु येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या अशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय मुष्ठीयुद्ध फेडरेशनने निवडलेल्या मुष्ठीयोद्ध्यांचा चमु सराव शिबिरासाठी चीनला रवाना झाला आहे. भारतीय मुष्ठीयोद्ध्यांसाठी सदर शिबिर 17 दिवसांचे राहिल.
या शिबिरात भारतीय मुष्ठीयोद्ध्यांना प्रशिक्षकांकडून बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे. चीनला रवाना झालेल्या भारतीय पथकामध्ये 13 मुष्ठीयोद्धे आणि 11 सहाय्यक प्रशिक्षक वर्गातील सदस्यांचा समावेश आहे.
भारतीय मुष्ठीयुद्ध संघ – पुरुष – दीपक, सचिन, शिवा थापा, निशांत देव, लक्ष्य चहर आणि नरेंद्र, महिला – निखत झरीन, प्रिती, परवीन, जस्मीन, अरुंधती चौधरी आणि लवलीना बोर्गोहेन.









