वृत्तसंस्था/जमशेदपूर (झारखंड)
येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या 134 व्या ड्युरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील क गटातील सामन्यात इंडियन आर्मी संघाने लडाख एफसी संघाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. इंडियन आर्मीने हा सामना जिंकला पण स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला नाही. क गटातील हा शेवटचा सामना होता. या विजयामुळे इंडियन आर्मी संघाने क गटातील गुणतक्त्यात 6 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. पण सरस गोल सरासरीच्या अभावामुळे इंडियन आर्मी संघाला या स्पर्धेची बाद फेरी गाठता आली नाही. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर अधिक भर दिला होता. 22 व्या मिनिटाला पी. कमलेशने इंडियन आर्मीच्या बचाव फळीतील खेळाडूंना हुलकावणी देत लडाख एफसीचे खाते उघडले.
36 व्या मिनिटाला लडाखचा दुसरा गोल विघ्नेशने केला. मध्यंतराला 10 मिनिटे बाकी असताना सामाने इंडियन आर्मीचा पहिला गोल केला. 45 व्या मिनिटाला अभिषेकने इंडियन आर्मीचा दुसरा गोल नोंदवून बरोबरी केली. 51 व्या मिनिटाला इंडियन आर्मीला पेनल्टीची संधी मिळाली आणि अभिषेक शंकरने यासंधीचा पुरेपूर फायदा घेत इंडियन आर्मीला 3-2 असे आघाडीवर नेले. 55 व्या मिनिटाला इंडियन आर्मीचा चौथा गोल राहुल रामकृष्णनने केला. लडाख संघाला शेवटच्या 20 मिनिटांमध्ये गोल करण्याच्या काही संधी उपलब्ध झाल्या होत्या. पण इंडियन आर्मीच्या भक्कम गोलरक्षणामुळे त्यांना या सामन्यात केवळ दोन गोलांवर समाधान मानावे लागले. इंडियन आर्मी संघाने या स्पर्धेत दोन सामने जिंकून 6 गुण मिळविले. पण त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. लडाख एफसी संघाला केवळ एका गुणांवर समाधान मानावे









