वृत्तसंस्था/ सॅक्रेमेंटो,
अमेरिका
येथे झालेल्या भारत आणि अमेरिका सेनादल संघातील पोलो कसोटी सामन्यामध्ये भारताने अमेरिकेचा 13-10 अशा फरकाने पराभव केला. 2019 नंतर भारतीय सेनादल पोलो संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात हा पहिला विजय मिळविला आहे.
भारतीय सेनादल पोलो संघामध्ये पृथ्वी सिंग, यतिंदर कुमार, मृत्युंजय सिंग आणि आर. के. गौतम यांचा समावेश होता. मृत्युंजय दुसऱ्या चकरमध्ये (सत्र) जखमी झाला होता तरी त्याने चौथ्या चकरपर्यंत खेळ केला. नंतर त्याच्या जागी गौतमला घेण्यात आले. पोलोच्या नार्मल गेममध्ये साडेसात मिनिटांचे चार चकर घेतले जातात नियमित पोलो मैदाना 10 एकराचे असते. त्यात फक्त सीमारेषा आखलेल्या असतात. बाजूला चार भिंती ठेवलेल्या नसतात.









