ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AMIM)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला. अरुणाचल प्रदेशातील तवांग (Tawang) येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर किंवा एलएसीवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर संसदेत चर्चा न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी असा आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांनी “आमच्या हद्दीत कोणीही प्रवेश केलेला नाही, असे सांगून देशाची दिशाभूल केली आहे” असा ही आरोप त्यांनी केला.
सभागृहात बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख म्हणाले की, “भारतीय लष्कर खूप शक्तिशाली आहे मात्र सरकार खूप कमकुवत असून चीनला घाबरते. पंतप्रधानांनी ‘आमच्या हद्दीत कोणीही घुसलेले नाही,’ असे सांगून देशाची दिशाभूल केली आहे. चीनच्या सैनिकांनी डेपसांग आणि डेमचोकवर कब्जा केल्याचे सॅटेलाइट इमेजेस याचा पुरावा असून ते आमची जमीन बळकावत आहेत.”
संसदेत सर्वपक्षीय बैठक किंवा चर्चेची मागणी करताना ओवेसी म्हणाले, “सरकार चीनबाबत काय भुमिका घेत आहे हे स्पष्ट करावे. आपले लष्कर खूप शक्तिशाली आहे पण सरकार कमकुवत आहे. ते चीनला घाबरते.” असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









