प्रयागराज येथील वायुसेना दिनाच्या कार्यक्रमात अनावरण : एअर शोमध्ये 120 विमानांची प्रात्यक्षिके
वृत्तसंस्था/ प्रयागराज
आपला 91 वा स्थापना दिवस साजरा करत असतानाच भारतीय हवाई दलाला नवी ओळख मिळाली आहे. हवाई दलाने आपला ध्वज बदलला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे पार पडलेल्या दिमाखदार कार्यक्रमात रविवार, 8 ऑक्टोबर रोजी नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. भारतीय वायुसेनेची मूल्ये चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी नवीन ध्वज तयार करण्यात आला आहे. येथे एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी नवीन ध्वजाचे अनावरण केले. यासोबतच हवाई दलाने आपली ताकद इथे जगाला दाखवून दिली. अनेक लढाऊ विमानांसह विमानांच्या ताफ्याने उ•ाण करत भारतीय हवाई दल जगातील सर्वोत्तमपैकी एक असल्याचे दाखवून दिले.
भारतीय वायुसेना दिनाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला अधिकारी गटाच्या पॅप्टन शैलजा धामी यांनी प्रयागराजच्या बमरौली येथील वायुसेना स्थानकावर आयोजित परेडची कमान सांभाळली. त्यांनी आपले कार्य उत्तम पद्धतीने बजावले. या परेडमध्ये एकूण 40 महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये 31 महिला अग्निवीरांचाही समावेश होता. प्रथमच अग्निवीर जवानांचा येथील परेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. या परेडमध्ये एकूण 361 हवाई योद्धा सहभागी झाले होते. यावेळी भव्य प्रात्यक्षिक सुरू झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. सकाळी 7.40 वाजता परेडला सुऊवात झाली. काही वेळातच पॅराट्रूपर्सच्या चमूने 8,000 फूट उंचीवरून हवेत उडी मारण्यास प्रारंभ करताच बमरौली येथील सेंट्रल एअर कमांड कॉम्प्लेक्स टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले.

प्रयागराजमधील संगमवर आयएएफच्या मिग-21 लढाऊ विमानाने यावषी शेवटच्या वेळी आयएएफ डे फ्लायपास्टमध्ये भाग घेतला. नवीनतम सी-295 वाहतूक विमानासह सुमारे 110 विमानांनी फ्लायपास्टमध्ये सहभाग नोंदवला. हवाई प्रदर्शनात राफेल, सुखोई-30, मिराज-2000, मिग-29, जग्वार, एलसीए तेजस, सी-17, सी-130 जे, आयएल-76, एएन-32, चिनूक्स, अपाचेस आणि हॉक्स यांचा समावेश होता.
पहिल्यांदाच परेडची कमान महिला पॅप्टनच्या हाती
ग्रुप पॅप्टन शैलजा धामी यांनी यावषी आयएएफ लढाऊ युनिटची आघाडी घेणारी पहिली महिला बनून इतिहास रचला. सध्या त्या पश्चिम सेक्टरमध्ये मिसाईल स्क्वाड्रनचे नेतृत्व करत आहेत. 2003 मध्ये भारतीय हवाई दलात भरती झाल्यापासून एक कुशल फ्लाइट टेनर होण्यापर्यंत त्यांनी धडक मारली आहे. यंदा पहिल्यांदाच या परेडमध्ये सर्व महिलांचा ताफा सहभागी झाल्याचे आयएएफचे प्रवक्ते विंग कमांडर आशिष मोघे यांनी गौरवाने सांगितले.
नवीन ध्वजाची ओळख
भारतीय वायुसेनेची मूल्ये ठळकपणे व्यक्त करण्यासाठी नवीन ध्वज तयार करण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेच्या नवा ध्वजामध्ये तिरंग्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आयएएफ व्रेस्टच्या शीर्षस्थानी राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ आणि त्याखाली देवनागरीमध्ये ‘सत्यमेव जयते’ असे शब्द आहेत. अशोकस्तंभाच्या खाली पंख पसरलेल्या स्वरुपात एक हिमालयीन गऊड दिसत आहे. हे चिन्ह भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैशिष्ट्याचे प्रतीक आहे. हिमालयीन गऊडाभोवती असलेल्या वर्तुळाकार आकारात ‘भारतीय वायुसेना’ असे शब्द लिहिलेले आहेत. भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्मय ‘नभ: स्पृशं दीप्तम्’ हे हिमालयीन गऊडाच्या खाली सोनेरी देवनागरी अक्षरात कोरलेले आहे. हवाई दलाचे हे ब्रीदवाक्मय भगवद्गीतेच्या अध्याय 11 श्लोक 24 वरून घेतले असून त्याचा अर्थ ‘आकाशाला वैभवाने स्पर्श करणे’ असा आहे.









