वृत्तसंस्था/ (नेदरलँड्स)
भारतीय अ पुरुष हॉकी संघाने प्रभावी कामगिरी करत आयर्लंडचा 6-1 असा पराभव केला भारतीय संघाने येथील हॉकी क्लब ओरांजे-रूड येथे झालेल्या युरोपियन दौऱ्याची दमदार सुरुवात केली.
मंगळवारी रात्री भारताने मिळवलेल्या विजयात उत्तम सिंग, अमनदीप लाक्रा, आदित्य लालागे, सेल्वम कार्ती आणि बॉबी सिंग धामी यांनी गोल केले. भारताने चारही क्वार्टरमध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि एकही पाऊल चुकले नाही. उत्तमने गोल करून सुरुवात केली आणि नंतर अमनदीपने भारतीय संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर आदित्यने सलग दोन गोल करत प्रभावी कामगिरी केली.फॉरवर्ड सेल्वम कार्ती आणि बॉबी सिंग धामी यांनीही प्रत्येकी एक गोल केला जो स्कोअरशीटमध्ये समाविष्ट झाला. आयर्लंडला फक्त एक सांत्वन गोल करता आला कारण भारताने त्यांच्या बचावफळीत कडक कामगिरी केली. भारताचा पुढील सामना बुधवारी रात्री पुन्हा आयर्लंडशी होईल. त्यानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये ते फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम आणि यजमान नेदरलँड्सविरुद्ध खेळतील.









