मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी इंडियाबुल्स रिअल इस्टेटचा समभाग सध्याला 52 आठवडय़ाच्या नीचांकावर पोहचला असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. दोन सत्रात सदरच्या कंपनीचा समभाग 15 टक्के इतका खाली घसरला आहे. इंडियाबुल्सचा समभाग मंगळवारी 10 टक्के इतका घसरत 53.75 रुपयांवर नीचांकी पातळी गाठत व्यवहार करत होता. याआधी हा समभाग 60.35 रुपयांवर बंद झाला होता.









