वृत्तसंस्था/ बिश्क्sढढक (किर्गीझस्तान)
नुकत्याच येथे झालेल्या 17 वर्षाखालील तसेच 23 वर्षाखालील वयोगटाच्या 2023 च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मल्लांनी दर्जेदार कामगिरी करताना 13 सुवर्ण, 13 रौप्य आणि 18 कास्य अशी एकूण 44 पदकांची लयलूट केली.
सदर स्पर्धा 10 ते 18 जून दरम्यान बिशेक येथे आंतरखंडीय स्तरावर घेण्यात आली. या स्पर्धेत भारताच्या 60 मल्लांनी आपला सहभाग दर्शवला होता. विविध वजन आणि वयोगटातील पुरुष आणि महिलांच्या ग्रीको रोमन व फ्रिस्टाईल प्रकारात मल्लांनी आपला सहभाग दर्शवला होता. सदर स्पर्धा 10 विविध वजन गटात घेण्यात आली. भारतीय कुस्ती संघटनेने या स्पर्धेसाठी 17 वर्षाखालील वयोगटात या स्पर्धेत प्रत्येक वजन गटात एक मल्ल पाठवला होता. ही स्पर्धा 10 ते 13 जून दरम्यान झाली. त्यानंतर 23 वर्षाखालील वयोगटातील कुस्ती स्पर्धा 15 ते 18 जून दरम्यान खेळवली गेली. 17 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा भारतीय मल्लांनी 8 सुवर्णपदके मिळवली तर 23 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय मल्ल सागर जेगलानने 5 सुवर्णपदकांची कमाई करत केली. सागरने 2021 साली कॅडेट क्गटात विश्व चॅम्पियन पुरस्कार मिळवला होता.
पदक विजेते मल्ल- प्रत्येक वयोगटातील, 17 वर्षाखालील स्पर्धा-
महिला – सृष्टी 69 किलो वजनगट- सुवर्णपदक, सविता 61 किलो वजनगट- सुवर्ण, परवीन 43 किलो वजनगट- सुवर्णपदक, रचना 40 किलो वजनगट- सुवर्ण, काजल 73 किलो वजनगट- सुवर्ण, शिक्षा 65 किलो वजनगट- सुवर्ण, नेहा 57 किलो वजनगट- सुवर्ण, अंकुश 55 किलो फ्रिस्टाईल गट – सुवर्ण.
पुरुष – सुरज 55 किलो ग्रीको रोमन गट- रौप्यपदक, सिद्धार्थ पाटील 48 किलो वजनगट- रौप्य, सचिन कुमार 65 किलो वजनगट- रौप्य, अमन 80 किलो वजनगट- रौप्य, मुस्कान (महिला) 46 किलो गट-रौप्य, सौरभ 80 किलो फ्रिस्टाईल गट-रौप्य, रुपेश 48 किलो फ्रिस्टाईल- रौप्य, रोहित 51 किलो फ्रिस्टाईल-रौप्य, धनराज शिर्के 45 किलो फ्रिस्टाईल-रौप्य,
रोनक 110 ग्रीको रोमन गट-कास्यपदक, रंजिता (महिला) 53 किलो वजनगट- कास्यपदक, नरेंद्र 71 किलो फ्रिस्टाईल- कास्यपदक, सौरभ 65 किलो फ्रिस्टाईल गट-कास्यपदक, तुषार 60 किलो फ्रिस्टाईल गट-कास्यपदक, विनय 92 किलो फ्रिस्टाईल गट -कास्यपदक, जसपुरनसिंग 110 किलो फ्रिस्टाईल गट – कास्यपद.
23 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा
महिला – निलम 50 किलो वजनगट- सुवर्ण, अंजली 59 किलो वजनगट- सुवर्ण, हर्षित 76 किलो वजनगट- सुवर्ण, मोहितकुमार (पुरुष), फ्रीस्टाईल 61 किलो गट-सुवर्ण, सागर जेगलन 79 किलो फ्रिस्टाईल गट-सुवर्ण, तमन्ना (महिला) 53 किलो वजनगट- रौप्य, राधिका 65 किलो वजनगट- रौप्य, रजनी 57 किलो वजनगट- रौप्य, भातेरी (65 किलो गट ) रौप्यदक.
प्रवीण पाटील ग्रीको रोमन 60 किलो वजनगट- कास्य, विकास 77 किलो गट -कास्य, नितेश 97 किलो वजनगट- कास्य, ललित 55 किलो वजनगट- कास्य, अंकित 63 किलो वजनगट- कास्य, मनोजकुमार 87 किलो वजनगट- कास्य, निकिता (महिला) 62 किलो गट-कास्य, शुभम 57 किलो फ्रिस्टाईल गट-कास्य, साहिल 97 किलो गट-कास्य, अभिमन्यु 70 किलो वजनगट- कास्य, प्रवीणकुमार 92 किलो फ्रिस्टाईल गट-कास्यपदक









