वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोलालंपूर मलेशिया येथे 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात आलेल्या स्पेशल ऑलिम्पिक्स आशिया पॅसिफीक 2025 च्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण 4 पदकांची कमाई केली. या स्पर्धेमध्ये 10 देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये भारताच्या चानवी शर्माने महिला एकेरीत सुवर्णपदक तर सुजिता सुकुमारन समवेत महिला दुहेरीत रौप्य पदक मिळविले. अंकित दलालने पुरूषांच्या एकेरीत रौप्य पदक तसेच अमल बिजुसमवेत पुरूष दुहेरीत रौप्य पदक पटकाविले. सदर स्पर्धेमध्ये 10 देशांचे सुमारे 80 स्पर्धक सहभागी झाले होते.









