वृत्तसंस्था / रोटरडॅम (नेदरलँड्स)
येथे झालेल्या विश्व रॅकेटलॉन चॅम्पियनशिप चॅलेंजर्स चषक स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने पटकाविले. विक्रमादित्य चौफुल्लाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात डेन्मार्कवर थरारक विजय मिळवित जेतेपद हस्तगत केले.
या स्पर्धेमध्ये भारताने उपांत्यपूर्वफेरीच्या लढतीत अमेरिकेचा पराभव केला. त्यानंतर चुरशीच्या उपांत्य लढतीत भारताने जर्मनीवर मात करत अंतिम फेरी गाठली. डेन्मार्क आणि भारत यांच्यात जेतेपदासाठीची लढत झाली. भारतीय रॅकेटलॉन संघातील खेळाडूंनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवित डेन्मार्कचा पराभव केला. जेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये प्रशांत सेन, निहीत सिंग, सुहेर कपूर, कृष्णा कोटक, निधी तिवारी, राघव जेटिया यांचा समावेश आहे. रॅकेटलॉन या क्रीडा प्रकारामध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस आणि स्क्वॅशमधील चार रॅकेटस्चा वापर केला जातो.









