वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जयपूर पोलो मैदानावर सुरु असलेल्या कोगनीव्हेरा आंतरराष्ट्रीय पोलो चषक स्पर्धेतील सामन्यात यजमान भारताने अर्जेंटिनाचा 10-9 असा निसटता पराभव केला. या सामन्यात भारताचे नेतृत्व जयपूरचे सवाई पद्मनाभ सिंग यांच्याकडे सोपविण्यात आले होते. या सामन्यात भारताने दर्जेदार खेळ करत अर्जेंटिनावर निसटता विजय मिळविला असून याचे श्रेय संघातील प्रत्येक खेळाडूला द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया कर्णधार सिमरन सिंग शेरगिलने व्यक्त केली आहे.









