वृत्तसंस्था/ अँटेलिया
येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्टेज वन तिरंदाजी स्पर्धेत शनिवारी कम्पाऊंड मिश्र सांघिक तिरंदाजी प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनाम आणि तिचा साथीदार ओजस देवतले यांनी सुवर्णपदक पटकावले.
मिश्र सांघिक कम्पाऊंड तिरंदाजी प्रकारातील अंतिम लढतीत ज्योती सुरेखा व्हेनाम आणि ओजस देवतळे, यांनी चीन तैपेईच्या तिरंदाजपटूंचा 159-154 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. 2022 साली पॅरीस येथे झालेल्या विश्वचषक स्टेज 3 तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती व्हेनाम आणि अभिषेक वर्मा यांनी सुवर्णपदक मिळवले होते. मात्र यावेळी अँटेलियातील या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेसाठी भारतीय संघातून अभिषेक वर्माला निवड चाचणीनंतर वगळण्यात आले होते.









