वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या आशियाई योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत यजमान भारताने 83 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 87 पदकांची लयलुट करत प्रथम स्थान पदकतक्त्यात मिळविले.
योगासन या प्रकारात भारतीय स्पर्धकांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत जपानने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह दुसरे स्थान, तर पदक तक्त्यात मंगोलीया तिसऱ्या, ओमान चौथ्या आणि नेपाळ पाचव्या स्थानावर राहिले. सदर स्पर्धेमध्ये 21 देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते. सदर स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. या स्पर्धेच्या समारोप समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा तसेच दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय चौधरी व क्रीडा क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.









