आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदके मिळविलेले भारतीय खेळाडू
वृत्तसंस्था / डोहा
येथे नुकत्याच झालेल्या 2024 च्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या पुरुष व महिला वेटलिफ्टींग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी दर्जेदार कामगिरी करताना 33 पदकांची कमाई केली.
कतारमध्ये ही झालेल्या स्पर्धा 40 विविध विभागात खेळविण्यात आली. कनिष्ठ आणि युवा अशा दोन विभागात प्रत्येकी 20 विविध गटात ही स्पर्धा झाली. स्नॅच, क्लिन आणि जर्क तसेच सर्वंकश अशा गटामध्ये ही स्पर्धा झाली. भारताच्या स्पर्धकांनी 13 ते 17 वर्षे वयोगटाच्या युवा विभागात एकूण 21 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 7 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. 15 ते 20 वर्षे वयोगटाच्या कनिष्ठ विभागात भारताने एकूण 12 पदके मिळविली आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उत्तरप्रदेशची 16 वर्षीय महिला वेटलिफ्टर ज्योत्स्ना साबर हिने 40 किलो वजन गटात 3 सुवर्ण पदकांची कमाई केली. तसेच भारतीय संघातील पायलने आणि संजना यांनी अनुक्रमे महिलांच्या 45 आणि 76 किलो वजन गटात प्रत्येकी 5 पदके मिळविली. गेल्या वर्षी ग्रेटर नोयडा येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने एकूण 42 पदके मिळविली होती.









