वृत्तसंस्था/ अहमदाबाद
अखिल भारतीय दिव्यांग क्रिकेट मंडळातर्फे येथे आयोजिलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
रविवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 146 धावा जमविल्या. मध्यफळीतील योगेंद्रने 26 चेंडूत 2 षटकारासह 21 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे फ्लिन, क्लेपहॅम आणि डॅनियल मिचेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर इंग्लंडचा डाव 18 षटकात 97 धावात आटोपला. इंग्लंडच्या डावात अँगस ब्राऊनने सर्वाधिक म्हणजे 25 धावा केल्या. भारतातर्फे रवींद्र सान्तेने 8 धावात 2 गडी बाद केले. या सामन्यात सान्तेने फलंदाजी करताना 18 धावा जमविल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.









