रशियाकडून महाशक्तिशाली रडारची होणार खरेदी
वृत्तसंस्था/ मॉस्को
भारत आणि रशिया 6 हजार किलोमीटरहून अधिक कार्यकक्षा असलेली एक अर्ली वॉर्निंग रडार सिस्टीम खरेदी करण्यासंबंधी एका कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी काम करत आहेत. या रडारची निर्मिती एस-400 तयार करणारी कंपनी अल्माज-एंटेने केली आहे. या रडारचे नाव वोरोनिश असून याची किंमत 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असल्याचे मानले जात आहे. दोन्ही देशांदरम्यान वोरोनिश रडारवरून चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
मागील महिन्यात रशियाच्या हवाई सुरक्षा प्रणालींच्या सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक अल्माज-एंटेच्या 10 सदस्यीय पथकाने उपाध्यक्ष ब्लादिमीर मेदोवनिकोव यांच्या नेतृत्वात भारताचा दौरा केला होता. यादरम्यान शिष्टमंडळाने व्यवहारात सामील होणाऱ्या ऑफसेट भागीदारांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली आणि बेंगळूरचाही दौरा केला होता. भारताच्या मेक इन इंडिया पुढाकाराच्या अनुरुप कमीतकमी 60 टक्के प्रणालीची निर्मिती भारतीय भागीदारांकडून केली जाणार आहे.
वोरोनिश रडारची वैशिष्ट्यो
अल्माज-एंटेच्या कॅटलॉगमध्ये वोरोनिश रडार सामील असून ते बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs, विमाने आणि दीर्घ पल्ल्याच्या अंतरावर अन्य हवाई धोक्यांचा शोध घेण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली एक प्रारंभिक इशारा रडार सिस्टीम आहे. ही सिस्टीम रशियाच्या क्षेपणास्त्र सुरक्षा आणि अंतराळ देखरेख मूलभूत सुविधेचा हिस्सा आहे. वोरोनिश रडारची ओळख कक्षा सुमारे 6 हजार ते 8 हजार किलोमीटर आहे. परंतु रेंज रडारचे वेरिएंट आणि त्या विशिष्ट आवृत्तीच्या बँडवर हे निर्भर असते.
केवळ तीन देशांकडे असा रडार
रशियन टीम या विशिष्ट रडार सिस्टीमला विकण्याची योजना आखत आहे का भारताने याच्या अत्याधुनिक वर्जनची मागणी केली आहे हे अद्याप स्पष्ट नाही. आतापर्यंत केवळ रशिया, चीन आणि अमेरिकेकडेच 5 हजार किमीपेक्षा अधिक संचालन सीमा असणारी रडार सिस्टीम आहे. रडार सिस्टीम कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये तैनात केली जाण्याची शक्यता आहे.
रशियाकडून 2012 मध्ये तैनात
रशियाने 2012 मध्ये या सिस्टीमचा वापर करण्यास सुरुवात केली होती. रशियाने स्वत:च्या व्यापक प्रारंभिक इशारा आणि क्षेपणास्त्र सुरक्षा व्यवस्थेच्या हिस्स्याच्या स्वरुपात कमीतकमी 10 वोरोनिश रडार सिस्टीम तैनात केल्या आहेत. हा रडार पूर्णपणे रक्षात्मक स्वरुपाचा असून त्यांना बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्यापासून बचाव आणि विमाने तसेच अन्य हवाई यानांच्या संभाव्य धोक्यांच्या देखरेखीसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
एलआरडीई करणार रडारचे संचालन
भारताच्या वतीने या प्रकल्पाला एलआरडीई (इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार विकास प्रतिष्ठान)कडून हाताळण्यात येणार आहे. एलआरडीई हा भारताच्या डीआरडीओचा एक हिस्सा आहे. 2022 साली डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांच्या नेतृत्वात एका टीमने मॉस्कोचा दौरा केला होता, ज्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार प्रणालीचे (ईसीएस) महासंचालक बी.के. दास आणि प्रकल्प संचालकासमवेत अन्य वरिष्ठ अधिकारी सामील होते.
भारताला मिळणार मोठे बळ
ईसीएसमध्ये एलआरडीई समवेत प्रयोगशाळांचा एक समूह सामील असून जो इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि लेजर-आधारित सिस्टीम आणि सेंसरला डिझाइन आणि विकसित करतो. या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण क्षमतांना महत्त्वपूर्ण स्वरुपात चालना मिळण्यासोबत देशभरात पुरेसा रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पात 50 हून अधिक भारतीय कंपन्या सामील आहेत.









