केंद्रीय मंत्री सिंधिया यांचा विश्वास
नवी दिल्ली
भारत आगामी काळात स्टीलचा सर्वात मोठा उत्पादक देश असेल, असा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी विश्वास व्यक्त केला आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱया क्रमांकाचा कच्च्या स्टीलचा उत्पादक देश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एनएमडीसी आणि एफआयसीसीआयतर्फे आयोजित भारतीय खनिज आणि धातू उद्योग या विषयावरील परिषदेत मंत्री सिंधिया यांनी ही माहिती दिली.
आगामी काळात भारत पोलादाचा निव्वळ आयातदार बनून निव्वळ निर्यातदार बनला आहे. 2013-14 मध्ये देशातील दरडोई स्टीलची विक्री 57.8 किलो होती, ती आता वाढून 78 किलो इतकी झाली आहे. सिंधिया म्हणाले की येणाऱया 2030 सालापर्यंत कच्च्या पालादाचे उत्पादन 300 दशलक्ष टन इतके घेण्याचे सरकारचे ध्येय आहे. आर्थिकसह भांडवली व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये पोलादाचा वापर हा हमखास केला जातो. त्यामुळे याचा वाढता वापर व मागणी लक्षात घेता भारताला यात झेप घेता येणे शक्य होणार आहे. कच्च्या पोलादातील एक नुसता निर्माता देश ऐवजी सर्वाधिक पोलादाचे उत्पादन घेणारा देश अशी ओळख महत्त्वाची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. भारताचे सध्याचे कच्च्या पोलादाचे उत्पादन हे 10 दशक्ष्ल टन इतके जून 2022 मध्ये आहे तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 120 दशलक्ष टन इतक्या कच्च्या पोलादाचे उत्पादन घेण्यात आले आहे.









