गुजरात रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
@ गांधीनगर / वृत्तसंस्था
भारत जगातील तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून भारताची आर्थिक प्रगती जोमदारपणे सुरु आहे. जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना क्रियान्वित केल्या आहेत. गुजरातमध्येही गेल्या पाच वर्षांमध्ये दीड लाख नव्या सरकारी नोकऱया निर्माण करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
भारत लवकरच स्टार्टअपची राजधानी होणार आहे. सध्या देशात 90 हजार हून अधिक स्टार्टअप कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी अधिकांश स्टार्टअप टायर 2 आणि टायर 3 शहरांमध्ये आहेत. रोजगारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढविण्यासाठी केंद्र सरकारचे सर्व विभाग तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची राज्य सरकारे कार्यरत आहेत. या सर्व राज्यांमध्ये रोजगार मेळाव्यांचे आयोजन होत असून गुजरातमध्ये गेल्या चार महिन्यांमध्ये दोनदा असे मेळावे भरविण्यात आले आहेत.
विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर
भाजप सरकारच्या काळात देशात बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी वाढली असे त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजगार रोजगार मेळाव्याचे उद्घाटत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करताना विरोधकांचा समाचार घेतला. सध्या साऱया जगातच अर्थव्यवस्थेच्या मंदीची परिस्थिती आहे. त्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत आहे. मात्र विरोधक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करीत असून सरकारवर खोटे आरोप करतात, असे भाजपचे म्हणणे आहे.









