बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक लढतीसाठी भारतीय संघ भगवी जर्सी वापरणार असल्याचे वृत्त मीडियामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बीसीसीआयने त्यावर खुलासा करताना सदर वृत्त फेटाळून लावले आहे. सर्व खेळाडू नेहमीप्रमाणे ब्ल्यू जर्सीच वापरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय संघ फक्त सरावावेळी भगव्या रंगाची वापरत आहेत. बीसीसीआयचे सचिव आशिष शेलार म्हणाले की, ‘पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ नेहमीपेक्षा दुसरी जर्सी वापरणार असल्याचे वृत्त आम्ही फेटाळून लावत आहोत. सदर वृत्त पूर्णपण निराधार असून कोणाच्या कल्पनेतून हे वृत्त बाहेर आले आहे,’ असे ते म्हणाले.
या महामुकाबल्यासाठी सर्व सज्ज झाले असून सामन्याभोवती असलेले वलय पाहून बीसीसीआयने 14,000 जाता तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर ही झुंज रंगणार आहे. 2016 मध्ये कोलकात्यात झालेल्या टी-20 विश्वचषक लढतीनंतर या दोघांत ही लढत होत आहे. त्यामुळे या सामन्यास प्रचंड गर्दी हाण्याची अपेक्षा केली जात आहे. कोलकात्याती सामना भारतानेच जिंकला होता.









