वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत सध्या ब्राझीलकडून कच्च्या तेलाची आयात वाढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. यावेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे, की भारताने दीर्घ कालावधीसाठी कच्च्या तेलामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी आवड दर्शवली आहे.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातक देश आहे. सध्या देश ब्राझीलकडून तेलाचा एक लहानसा हिस्साच आयात करत आहे. भारतीय कंपन्या दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी विचार करत आहेत.









