वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अमेरिकन विमानतळांवर गोंधळ उडाला. ट्रम्प यांनी सुरू केलेल्या गोंधळाचा फायदा घेण्यासाठी एअरलाईन्स प्रयत्न करत असल्याने भारतात अडकलेल्यांसाठी अमेरिकेला थेट उ•ाणांचा खर्च गगनाला भिडला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेच्या दोन तासांतच नवी दिल्लीहून न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी एकेरी विमान भाडे अंदाजे 37,000 रुपयांवरून 70,000 ते 80,000 रुपये मोजावे लागत होते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि जेपी मॉर्गनसह अनेक टेक कंपन्यांनी भारतात किंवा इतरत्र प्रवास केलेल्या कर्मचाऱ्यांना 24 तासांत परत येण्यास सांगितले आहे. सध्या परदेशात असलेल्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब अमेरिकेत परत येण्यास सांगण्यात आले आहे.









