वेस्ट इंडिज दौऱ्यापासून भारताच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सत्राला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात न्यूझीलंडने तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले होते. दोन्ही वेळा अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या अॅशेस मालिकेपासून कसोटी चॅम्पियनशिपचे तिसरे सत्र सुरू झाले आहे. आता टीम इंडियाने या सत्रातील पहिले मॅच जिंकून जागतिक चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला धक्का दिला आहे. भारताने गुणतालिकेत सर्वांना मागे टाकात अव्वलस्थान पटकावले आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीत आतापर्यंत एकूण चार संघ आहेत ज्यांनी किमान एक सामना खेळला आहे. भारताशिवाय या यादीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. यामध्ये या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर होता. ज्याने इंग्लंडविरुद्ध पहिले दोन कसोटी सामने जिंकले होते, मात्र शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या प्रकरणात, गुणांच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाचे 22 गुण आहेत आणि भारताचे केवळ 12 गुण आहेत. पण एकही सामना न गमावल्यामुळे भारताच्या गुणांची टक्केवारी 100 आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिका (2023-25)
- भारत- 12 गुण
- ऑस्ट्रेलिया – 22 गुण
- इंग्लंड – 10 गुण
- वेस्ट इंडिज – 0 गुण









