वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा यु-23 पुरुष राष्ट्रीय संघ गुरुवारी एएफसीयु23 आशियाई कप पात्रता फेरीच्या गट एच मध्ये ड्रॉ करण्यात आला आणि त्यांचा सामना यजमान कतार, बहरीन आणि ब्रुनेई दारुस्सलाम यांच्याशी होईल. हा ड्रॉ कोलालंपूर येथील एएफसी हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता. चार संघापैकी सर्वोच्च मानांकित संघ कतार हा गट एच चे आयोजन करेल. ज्याचे सामने 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान खेळले जाणार आहेत. एकूण 44 संघांनी प्रत्येकी चार संघांच्या 11 गटात विभागण्यात आले होते. गट विजेते आणि चार सर्वोत्तम उपविजेते संघ, यजमान सौदी अरेबियासह जानारी 2026 मध्ये होणाऱ्या एएफसीयु23 आशियाई कपच्या सातया आवृत्तीसाठी 16 संघांची निवड पूर्ण करतील.
सोडतीसाठी सीडिंग स्पर्धेच्या मागील तीन आवृत्त्यांमधील संघांच्या अंतिम क्रमारीतून घेतलेल्या गुण प्रणालीवर आधारीत होती. भ्घरताला पॉट 3 मध्ये स्थान देण्यात आले. भारताने यापूर्वी नौशाद मुसा यांना त्यांच्या अंडग 23 राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षण म्हणून नियुक्त केले होते. मुसा 1 जूनपासून कोलकाता येथे प्रशिक्षण शिबिरासाठी जमतील तेंव्हापासून पदभार स्वीकारतील. त्यानंतर ते ताजिकिस्तान (18 जून) आणि किर्गिझस्तान प्रजासत्ताक (21 जून) विरुद्ध दोन एक्सपोजर सामने खेळण्यासाठी ताजिकिस्तानला जातील. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) सांगितले की, भारताचे अंडर 23 संघ एएफसी अंडर-23 आशियाई कप पात्रता फेरीच्या तयारीसाठी कॅम्प सेट करण्यासाठी आणि एक्सपोजर मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी सर्व फिफा आंतरराष्ट्रीय विंडोचा वापर करतील.
एएफसी अंडर 23 आशियाई कप 2026 पात्रता फेरीचे सामने
- गट अ : जॉर्डन (यजमान), तुर्कमेनिस्तान, चिनी तैपेई, भूतान
- गट ब : जपान, कुवेत, म्यानमार (ह), अफगाणिस्तान
- गट क : व्हिएतनाम (ह), येमेन, सिंगापूर, बांगलादेश
- गट ड : ऑस्ट्रेलिया, चीन (ह), तिमोर-लेस्टे, उत्तरी मारियाना बेटे
- गट इ : उझबेकिस्तान, पॅलेस्टाईन, किर्गिस्तान प्रजासत्ताक (ह), श्रीलंका
- गट फ : थायलंड (ह), मलेशिया, लेबनॉन, मंगोलिया
- गट ग : कतार (ह), बहरीन, भारत, ब्रुनेई दारुस्सलाम
- गट अ : संयुक्त अरब अमिरात (ह), आयआर इराण, हाँगकाँग चीन, ग्वाम
- गट ज : कोरिया प्रजासत्ताक, इंडोनेशिया (ह), लाओस, मकाऊ
- गट क : ताजिकिस्तान, सीरिया, फिलीपिन्स, नेपाळ









