एकूण स्टार्टअप्सची संख्या ही 25,000 ते 27,000 च्या दरम्यान
नवी दिल्ली
भारताने वर्ष 2022 मध्ये 1,300 हून अधिक सक्रिय टेक स्टार्टअप्स जोडले आणि अशा स्टार्टअप्सची एकूण संख्या 25,000 ते 27,000 च्या दरम्यान पोहोचली आहे, अशी माहिती नुकत्याच एका अहवालातून दिली आहे. भारत हा जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा टेक स्टार्टअप देश बनला असल्याचीही नेंद यामध्ये करण्यात आली आहे.
नॅसकॉम झिनॉव्ह (ऱ्एएण्ध्श् Zग्हहदन्) इंडियन टेक स्टार्ट-अप लँडस्केप रिपोर्ट 2022 मध्ये असे आढळून आले आहे की वर्ष 2022 मध्ये 23 पेक्षा जास्त (एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेल्या कंपन्या) असलेले युनिकॉर्न जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
नॅसकॉमचे अध्यक्ष डी घोष म्हणाले की, भारतीय स्टार्टअपनी आपल्या व्यवसायाप्रती दृष्टीकोन बदलायला हवा. नवनव्या संधींचा शोध घ्यायला हवा. सध्याची मंदी असूनही, उदयोन्मुख तंत्ज्ञानाचा फायदा घेणाऱ्या नाविन्यपूर्ण कंपन्यांसाठी संधी विपुल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.









