नवी दिल्ली : भारताने नव्या पिढीच्या ‘अग्नी प्राइम’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. सकाळी ९.४५ च्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या संबंधीची माहीती केंद्र सरकारच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितली.
संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहीती देताना म्हटले आहे कि, अग्नी प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने जास्तीत जास्त पल्ला गाठला आहे. या चाचणीवेळी मिसाईलकडून सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली” अग्नी प्राइम क्षेपणास्त्राच्या सलग तिसऱ्या यशस्वी उड्डाण चाचणीमुळे, या प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता सिध्द झाली आहे.” अधिक माहीती सांगताना संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, “रडार, टेलीमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम सारख्या- अनेक उपकरणांद्वारे डेटा प्राप्त करून या क्षेपणास्त्राची कार्यक्षमता वाढवली आहे.” या संबंधिचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









