वैद्यकीय अन् दिलासा सामग्रीचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने होंडुरास या देशाला 26 टन मदतसामग्री पाठविली आहे. हे सहाय्य अलिकडेच आलेल्या उष्णकटिबंधीय वादळ साराच्या पार्श्वभूमीवर पाठविण्यात आले आहे. होंडुरासला मानवीय सहाय्यसामग्री पाठविण्याविषयी विदेश मंत्रालयाने रविवारी माहिती दिली आहे.
या मदतसामग्रीत सर्जिकल पुरवठा, ग्लुकोमीटर, ऑक्सिमीटर, ग्लोव्ह्ज, सीरिंज आणि आयव्ही तरल पदार्थ, ब्लँकेट, स्लीपिंग मॅट आणि स्वच्छता किट समवेत वैद्यकीय पुरवठा अन् आपत्ती दिलासा सामग्री सामील असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले आहे.
नोव्हेंबर महिन्यात होंडुरासच्या किनाऱ्यावर सारा हे चक्रीवादळ धडकले होते, यामुळे तेथे पूर अन् भूस्खलनाचे संकट निर्माण झाले होते. यामुळे होंडुरासमध्ये घरे अन् अनेक सार्वजनिक सुविधा नष्ट झाल्या होत्या. तसेच मोठ्या संख्येत लोक विस्थापित झाले होते. याचबरोबर तेथे अनेक आजारांचे संकट उद्भवले आहे. भारत आणि होंडुरास दरम्यान मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत. यापूर्वीही अनेक आव्हानात्मक काळात भारत सरकारने होंडुरासला मदत केली आहे.









