नवी दिल्ली
भारताच्या सोने आयातीत जूनमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे समजते. किमतीत आलेली कमतरता तसेच येणाऱया उत्सवी काळाकरीता म्हणून सराफी व्यावसायिकांनी सोन्याची आयात अधिकची केली असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या जून महिन्यात 49 टन इतके सोने आयात करण्यात आले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात 17 टन सोने आयात करण्यात आले होते. किमतीच्या तुलनेत पाहता जूनमध्ये 2.61 अब्ज डॉलर्सच्या सोन्याची आयात करण्यात आली आहे.









