केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन : वर्षभरातील कामगिरीचा मांडला आलेख
नवी दिल्ली
भारतात 5जी सेवा सुरू होऊन केवळ एक वर्ष झाले आहे, परंतु इतक्या कमी कालावधीतही भारत या आघाडीवर जगातील अव्वल देशांपैकी एक बनला आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका मुलाखतीत पुढील 12 महिन्यात 5 जी सेवेसाठी सरकारचे प्राधान्य काय आहे ते सांगितले.
आम्ही जवळपास प्रत्येक जिह्यात (एकूण 766) 5जी सेवा प्रदान केली आहे. आम्हाला खात्री आहे की पुढील एका वर्षात देशातील सर्व तहसील (सुमारे 5,600) देखील 5जीच्या कव्हरेजखाली येतील. अशाप्रकारे देशात 5जी सेवेचा विस्तार लक्षणीय वाढणार असल्याचेही मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.
पुढील 12 महिन्यांसाठी 5 जी सेवेचे उद्दिष्ट काय आहे? आम्ही पहिल्या वर्षी 2 लाख साइट्स उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्याही पुढे जाऊन, आम्ही सुमारे 3.60 लाख साइट्स स्थापित केल्या आहेत. दुसऱ्या वर्षात देशात 4.30 लाख 5जी सेल साइट्स स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
गेल्या एका वर्षात देशात 5जी सेवा ज्या वेगाने वाढली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? सुरुवातीपासूनच आमचे लक्ष होते की देशात 5जी सेवा किती विस्तारत आहे. केवळ एका वर्षात 3.60 लाख 5जी साइट्स स्थापित केल्या गेल्याचा आम्हाला आनंद आहे. या उल्लेखनीय प्रगतीमुळे भारत हा चीन आणि अमेरिकेनंतर 5जी सेवा प्रदान करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. 5जी सेवा देशातील काही शहरांमध्येच उपलब्ध आहे की उर्वरित देशातही पोहोचली आहे? सध्या किती 5 जी सदस्य आहेत. सध्या 5जी ग्राहक कोण आहेत हे जाणून घेणे कठीण आहे कारण लोक 4 जी सोडून 5जी स्वीकारत आहेत.
6 जी वर भारताच्यायोजना काय आहेत?
आमची मानके आयटीयूद्वारे स्वीकारली जातात का ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.









