वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिफाने नुकत्याच घोषित केलेल्या पुरुषांच्या फुटबॉल सांघिक मानांकनात भारताने 2018 नंतर पहिल्यांदाच पहिल्या 100 संघामध्ये स्थान मिळवले आहे. अलीकडेच भारतीय पुरुष संघाने सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांची मानांकनात सुधारणा झाली. या स्पर्धेत भारताने लेबेनॉन आणि कुवेत या बलाढ्या संघांचा पराभव करून जेतेपद मिळवले होते. या कामगिरीमुळे भारताने फिफाच्या मानांकनात 99 वे स्थान मिळवले असून लेबेनॉन 100 व्या तर कुवेत 137 व्या स्थानावर आहे. 1996 साली भारतीय फुटबॉल संघाने फिफाच्या मानांकनात 94 वे स्थान मिळवले होते तर 1993 साली भारताने 99 वे स्थान पटकावले होते. 2017 आणि 2018 साली भारत 96 व्या स्थानावर होता तर गेल्या महिन्यात भारताने फिफाच्या मानांकनात 100 वे स्थान पटकावले होते.
फिफाच्या ताज्या मानांकनात विश्वकरंडक विजेता अर्जेंटिना पहिल्या स्थानावर असून फ्रान्स दुसऱ्या, ब्राझील तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या तर बेल्जियम पाचव्या स्थानावर आहे.
इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 275 धावांची आघाडी









