या वर्षी होणाऱ्या आशिया चषक सर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान (India- pakistan ) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहे. अशिया कपच्या एकाच गटात दोन्ही संघांना स्थान दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. या संबंधिची माहीती आशिया क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह (Jay Shah)यांनी गुरुवारी दिली.
अशिया कपमध्ये पात्रता फेरी वगळता एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 6 लीग सामने, 6 सुपरफोर गेम यांचा समावेश आहे. आणि शेवटी अंतिम सामना ज्यामध्ये 2 अव्वल संघ अंतिम सामन्यात खेळतील. या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे हे अजून जाहीर झाले नाही.
“2023 आणि 2024 साठी @ACCMedia1चे क्रिकेट कॅलेंडर सादर करत असून या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आमच्या अतुलनीय प्रयत्नांचे आणि उत्कटतेचे हे संकेत आहे. या स्पर्धेसाठी देशांतील सर्व क्रिकेटपटूंनी आपल्या नेत्रदीपक कामगिरीसाठी तयारी केली असल्यामुळे, क्रिकेटसाठी हा एक चांगला आहे” असे शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









