आयसीसीकडून महिला वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर : 30 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात
वृत्तसंस्था/ दुबई
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव, सीमा संघर्ष, आणि नुकतेच पार पडलेले ऑपरेशन सिंदूर यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध पूर्णपणे खराब झाले. यापार्श्वभूमीवर महिलांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट सामना रंगणार आहे. आयसीसीने सोमवारी महिला एकदिवसीय वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले. 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भारत व श्रीलंकेत ही स्पर्धा होईल.
आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार महिला विश्वचषक 2025 ला यावर्षी 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान, स्पर्धेचा पहिला सामना हा भारत आणि श्रीलंका यांच्यात बेंगळूरातील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. हायब्रिड मॉडेलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघ आपले सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळेल.
5 ऑक्टोबरला भारत-पाक आमनेसामने
भारत आणि पाकिस्तान सामना या स्पर्धेतील मुख्य आकर्षण असणार आहे. मात्र, हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघही भारतात येणार नाही. भारत आणि पाकिस्तान हा सामना कोलंबोत खेळवला जाणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाईल. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळण्राया भारतीय संघाला पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी कोलंबोला जावे लागणार आहे.
स्पर्धेत 8 संघाचा सहभाग
यजमान भारतासह, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा वर्ल्ड कपमध्ये समावेश आहे. राउंड-रॉबिन नंतर नॉकआउट टप्प्यात 2 उपांत्य फेरी होतील. दरम्यान, पाकिस्तान संघ सेमीफायनल-1 मध्ये जर पोहोचू शकला, तरच हा सामना कोलंबो येथे होणार आहे. जर असे झाले नाही तर गुवाहाटी येथे सेमीफायनल सामना आयोजित करण्यात येईल. स्पर्धेचा सेमीफायनल सामना 20 किंवा 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अंतिम सामना 2 तारखेला खेळवण्यात येणार आहे. यासाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पहिला कोलंबो आणि दुसरा बेंगळूर येथ होण्याची शक्यता आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक
30 सप्टेंबर : भारत वि श्रीलंका, बेंगळूर
1 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड, इंदूर
2 ऑक्टोबर : बांगलादेश वि पाकिस्तान, कोलंबो
3 ऑक्टोबर : इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका, बेंगळूर
4 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, कोलंबो
5 ऑक्टोबर : भारत वि पाकिस्तान, कोलंबो
6 ऑक्टोबर : न्यूझीलंड वि दक्षिण आफ्रिका, इंदूर
7 ऑक्टोबर : इंग्लंड वि बांगलादेश, गुवाहाटी
8 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, कोलंबो
9 ऑक्टोबर : भारत वि दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम
10 ऑक्टोबर : न्यूझीलंड वि बांगलादेश, विशाखापट्टणम
11 ऑक्टोबर : इंग्लंड वि श्रीलंका, गुवाहाटी
12 ऑक्टोबर : भारत वि ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम
13 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका वि बांगलादेश, विशाखापट्टणम
14 ऑक्टोबर : न्यूझीलंड वि श्रीलंका, कोलंबो
15 ऑक्टोबर : इंग्लंड वि पाकिस्तान, कोलंबो
16 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश, विशाखापट्टणम
17 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका, कोलंबो
18 ऑक्टोबर : न्यूझीलंड वि पाकिस्तान, कोलंबो
19 ऑक्टोबर : भारत वि इंग्लंड, इंदूर
20 ऑक्टोबर : श्रीलंका वि बांगलादेश कोलंबो
21 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, कोलंबो
22 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, इंदूर
23 ऑक्टोबर : भारत वि न्यूझीलंड, गुवाहाटी
24 ऑक्टोबर : पाकिस्तान वि श्रीलंका, कोलंबो
25 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका, इंदूर
26 ऑक्टोबर : भारत वि बांगलादेश, बेंगळूर
29 ऑक्टोबर : उपांत्य सामना 1 – गुवाहाटी/कोलंबो
30 ऑक्टोबर : उपांत्य सामना 2 – बेंगळूर
2 नोव्हेंबर: अंतिम सामना – कोलंबो/बेंगळूर









