पीसीबीची सहमती, पाक – श्रीलंका सामन्याच्या तारखेतही बदल
वृत्तसंस्था/ कराची
विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा सामना अहमदाबाद येथे मूळ नियोजित 15 ऑक्टोबर या तारखेऐवजी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ‘पीसीबी’ने ‘आयसीसी’ आणि ‘बीसीसीआय’शी त्यांच्या दोन सामन्यांच्या तारखांच्या प्रस्तावित बदलावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तान 12 ऑक्टोबरऐवजी 10 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये श्रीलंकेविऊद्ध खेळेल. यामुळे भारताच्या सामन्यापूर्वी त्यांना तीन दिवस मिळतील.
अहमदाबादमध्ये नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुरक्षा व्यवस्था करण्यासंदर्भातील समस्यांमुळे भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलावी लागली आहे. ‘आयसीसी’ आणि ‘बीसीसीआय’ने अहमदाबादमधील भारताविऊद्धच्या एका सामन्यासह दोन गट सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यासंदर्भात ‘पीसीबी’शी संपर्क साधला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ लवकरच नवीन वेळापत्रक जारी करेल. कारण इतर संघांचा समावेश असलेल्या काही सामन्यांचे वेळापत्रक देखील बदलावे लागणार आहे.
पाकिस्तानच्या सामन्यांचे सध्याचे वेळापत्रक असे आहे-6 ऑक्टोबर- हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध, 12 ऑक्टोबर-श्रीलंकेविरुद्ध हैदराबादमध्ये, 15 ऑक्टोबर-भारताविरुद्धअहमदाबादमध्ये, 20 ऑक्टोबर-ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळूरमध्ये, 23 ऑक्टोबर-अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईमध्ये, 27 ऑक्टोबर-दक्षिण आफ्रिकाविरुद्ध चेन्नईमध्ये, 31 ऑक्टोबर-बांगलादेशविऊद्ध कोलकाता येंथे, 4 नोव्हेंबर-न्यूझीलंडविरुद्ध बेंगळूरमध्ये.









