महिला आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर : 12 जूनपासून इंग्लंडमध्ये स्पर्धेला प्रारंभ
वृत्तसंस्था/ लंडन
आयसीसीने 2026 मध्ये होणाऱ्या महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे असणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना इंग्लंड व श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना 12 जून रोजी खेळवला जाईल. नुकताच आयसीसीकडून महिला वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. 5 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकला पुन्हा एकाच गटात स्थान देण्यात आले असून ही लढत 14 जून रोजी होईल.
आयसीसीने सोमवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून या स्पर्धेची सुरुवात 12 जूनपासून होणार आहे. स्पर्धेत एकूण 12 संघ भाग घेणार असून दोन गट करण्यात आले आहेत. गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिकेसह भारत पाकिस्तान संघ आहेत. तसेच इतर दोन संघ पात्रता फेरीतून या वर्षभरात निश्चित होतील. तर गट 2 मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे संघ असतील. तर इतर दोन संघ पात्रता फेरीतून ठरतील. नियमानुसार प्रत्येक संघ साखळी फेरीत पाच सामने खेळेल आणि गटात टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. हे सामने 30 जून आणि 2 जुलै रोजी खेळवला जाईल. तर स्पर्धेतील अंतिम सामना 5 जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील सामने द ओव्हल, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड, एजबॅस्टन, हॅम्पशायर बाऊल, हेडिंग्ले आणि लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहेत.
14 जूनला भारत-पाक आमनेसामने
भारत आणि पाकिस्तान त्यांच्या मोहिमेची सुरुवात एजबॅस्टन येथेच करतील. वनडे वर्ल्डकपनंतर हे दोन्ही संघ पुन्हा टी 20 वर्ल्डकपमध्ये 14 जूनला आमनेसामने येतील. या हायव्होल्टेज लढतीची चाहत्यांना आतापासून उत्सुकता लागली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर, भारत 17 जून रोजी पात्रता संघाविरुद्धच्या सामन्यासाठी हेडिंग्लेला जाईल आणि त्यानंतर 21 जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. भारत 25 जून रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे गट अ मधील दुसऱ्या पात्रता संघाचा सामना करेल, तर 28 जून रोजी भारत ऑस्ट्रेलियाचा सामना करेल.
आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक
- 12 जून : इंग्लंड वि श्रीलंका, एजबॅस्टन
- 13 जून : क्वालिफायर वि क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
- 13 जून : ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
- 13 जून : वेस्ट इंडिज वि न्यूझीलंड, हॅम्पशायर बाऊल
- 14 जून : क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर, एजबॅस्टन
- 14 जून : भारत वि पाकिस्तान, एजबॅस्टन
- 16 जून : न्यूझीलंड वि श्रीलंका, हॅम्पशायर बाऊल
- 16 जून : इंग्लंड वि क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
- 17 जून : ऑस्ट्रेलिया वि क्वालिफायर, हेडिंग्ले
- 17 जून : भारत वि क्वालिफायर, हेडिंग्ले
- 17 जून : दक्षिण आफ्रिका वि पाकिस्तान, एजबॅस्टन
- 18 जून : वेस्ट इंडिज वि क्वालिफायर, हेडिंग्ले
- 19 जून : न्यूझीलंड वि क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
- 19 जून : ऑस्ट्रेलिया वि क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
- 19 जून : पाकिस्तान वि क्वालिफायर, हॅम्पशायर बाऊल
- 20 जून : इंग्लंड वि क्वालिफायर, हेडिंग्ले
- 21 जून : वेस्ट इंडिज वि श्रीलंका, ब्रिस्टॉल काउंटी ग्राउंड
- 21 जून : दक्षिण आफ्रिका वि भारत, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
- 23 जून : न्यूझीलंड वि क्वालिफायर, ब्रिस्टॉल काउंटी ग्राउंड
- 23 जून : श्रीलंका वि क्वालिफायर, ब्रिस्टॉल काउंटी ग्राउंड
- 23 जून : ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, हेडिंग्ले
- 24 जून : इंग्लंड वि वेस्ट इंडिज, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
- 25 जून : भारत वि क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
- 25 जून : दक्षिण आफ्रिका वि क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
- 26 जून : श्रीलंका वि क्वालिफायर, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
- 27 जून : पाकिस्तान वि क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
- 27 जून : वेस्ट इंडिज वि क्वालिफायर, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
- 27 जून : इंग्लंड वि न्यूझीलंड, द ओव्हल
- 28 जून : दक्षिण आफ्रिका वि क्वालिफायर, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
- 28 जून : ऑस्ट्रेलिया वि भारत, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
- 30 जून : टीबीसी विरुद्ध टीबीसी (सेमीफायनल 1), द ओव्हल
- 2 जुलै : टीबीसी विरुद्ध टीबीसी (सेमीफायनल 2), द ओव्हल
- 5 जुलै : टीबीसी विरुद्ध टीबीसी (अंतिम सामना), लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड









