वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि ओमान यांच्यात लवकरच मुक्त व्यापार करार होणार आहे. या कराराचे इंग्रजी प्रारुप सज्ज आहे. मात्र, त्याचे ओमानमध्ये अरबी भाषेत भाषांतर केले जात आहे. ही भाषांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या होतील आणि हा करार अस्तित्वात येईल, अशी माहिती भारताकडून देण्यात आली आहे. या करारामुळे या दोन्ही देशांचा लाभ होणार असून ओमानमध्ये काम करणाऱ्या भारतीयांनाही या करारामुळे समाधान वाटणार आहे, असे प्रतिपादन ओमानकडून करण्यात आले आहे. हा मुक्त व्यापार करार असल्याने दोन्ही देश एकमेकांच्या वस्तूंवर शून्य कर किंवा अत्यल्प कर लावणार आहेत. हा करार अस्तित्वात आल्यानंतर भारत आणि ओमान यांच्या परस्पर व्यापारात दुपटीहून अधिक वृद्धी शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.









