वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि नेपाळ महिला फुटबॉल संघामध्ये दोन मित्रत्वाचे फुटबॉल सामने आयोजित केले आहेत. भारत आणि नेपाळ फुटबॉल संघटनेमध्ये या सामन्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला आहे. सदर सामने 15 आणि 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये आयोजित होणार आहेत.
चेन्नईच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर उभय संघातील पहिला सामना 15 फेब्रुवारीला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता तर दुसरा सामना 18 फेब्रुवारीला सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.









