वृत्तसंस्था/ चियांग मेई (थायलंड)
महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या मोहिमेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. सोमवारी भारत आणि मंगोलिया महिला संघामध्ये पात्र फेरी स्पर्धेतील पहिला सामना येथे खेळवला जाणार आहे.
3 वर्षापूर्वी कोरोना समस्येमुळे भारतीय महिला फुटबॉल संघाला गत एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या मोहिमेला चांगलाच विलंब झाला होता. आगामी आशिया चषक महिलांची फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात भरवली जाणार आहे. 2003 साली भारतीय फुटबॉल संघाने एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. फिफाच्या महिला फुटबॉल संघाच्या मानांकनात भारत 70 व्या स्थानावर असून यजमान थायलंड 46 व्या स्थानावर आहे.









