वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि मलेशिया यांनी एकत्र येऊन सागरी सुरक्षा आणि अन्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी एका गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या गटाच्या माध्यमातून दोन्ही देशांनी सुरक्षा क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी भारत-मलेशिया संरक्षण सहयोग समितीची बैठक पार पडली. या बैठकीत असा गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सुरक्षा क्षेत्रात सहकार्य हा चर्चेचा महत्वाचा मुद्दा होता. सध्याच्या काळात समुद्री सुरक्षेला अतिशय महत्व प्राप्त झाल्याने, या क्षेत्रात सर्व संबंधित देशांचे एकमेकांशी सहकार्य आयवश्यक आहे. परिणामी, असा गट स्थापन करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे भारताकडून आणि मलेशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









