वृत्तसंस्था / चेन्नई
येथील नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेतील अ गटातील तिसऱ्या सामन्यात कतारने भारताचा 69-53 असा पराभव केला. या पराभवामुळे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे सौदी अरेबियात 2025 साली होणाऱ्या फिबाच्या आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळविण्याच्या आशेला धक्का बसला आहे.
भारत आणि कतार यांच्यातील या सामन्यात भारतातर्फे हाफीजने 17 तर प्रणव प्रिन्सने 13 गुण नोंदविले. कतारतर्फे हॅरीसने सर्वाधिक म्हणजे 17 गुण नोंदविले. आता भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना सोमवारी कझाकस्थानबरोबर होणार आहे.









